औरंगाबाद- बाहेर राज्यातून
पोट भरण्यासाठी आलेला मजूर स्थानिक मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो आणि
मुलीने विरोध केल्यानंतर तीचा गळा दाबून खून करतो. ही अतिशय गंभीर घटना असून या
आरोपीचे वकीलपत्र कुठल्याही वकीलाने घेऊ नये अशा मागणीचे निवेदन जिल्हा वकील
महासंघाचे अध्यक्ष सुनील जाधव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले. वकील
संघाने देखील या मागणीस होकार कळवलेला आहे. एमजीएम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या डॉ.
आकांक्षा देशमुख हीचा वसतिगृहात खून करण्यात आला होता. घटनेच्या ७ दिवसांनंतर
पोलिसांनी परप्रांतीय बांधकाम मजुराला या प्रकरणी अटक केलेली आहे.
एमजीएममध्ये फिजीओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा देशमुख
हीचा दि.११ हॉस्टेलच्या रुममध्ये घूसून गळा दाबून खुन करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेच्या ७ दिवसानंतर राहुल शर्मा
या परप्रांतीय बांधकाम मजूराला अटक केली आहे. आकांक्षाच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत
दुर्देवी असून, आकांक्षा ही तिच्या आई-वडीलांची एकूलती एक मुलगी होती. त्यामुळे
अशा आरोपीचे वकीलपत्र कुठल्याही वकीलाने घेऊ नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, बिपीन नाईक, संदीप कुलकर्णी, वैभव मिटकर,
सतनामसिंग गुलाटी, राजू जावळीकर, मंगेश साळवे, राहुल पाटील, प्रविण मोहीते, निनाद
खोचे, किरण जोगदेंडे उपस्थित होते.